UPCOMING MARATHI MOVIE : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस

हजार वेळा शोले पाहिलेला माणूस : शोले चित्रपट बघितलेला नाही किंवा माहिती नाही, अशी व्यक्ती सापडणे केवळ अशक्य आहे. शोले भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटापैकी एक चित्रपट. शोले चित्रपटातील सर्वच पात्रांना तुफान प्रसिद्धी मिळाली. आता हा चित्रपट आठवायचा कारण म्हणजे मराठीत एक नवा चित्रपट येतोय, त्याचे नाव आहे ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’. चित्रपटाचे नाव ऐकूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले असणार, एवढ नक्की. ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
DILIP PRABHAVALAKR AND SIDDHARTH JADHAV

हजार वेळा शोले पाहिलेला माणूस :  १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले आणि मोडले होते. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.  ‘शोले’ चित्रपटाच्या याच आठवणींना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट सलाम करणार आहे.

ALSO READ THIS : https://filmykhabare.com/main-atal-hoon-film-disaster-the-magic-of-main-atal-hoon-did-not-work-at-the-box-office/

हजार वेळा शोले पाहिलेला माणूस : राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, श्रीरंग महाजन यांची महत्वाची भूमिका आहे. तर आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकणार आहेत. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. त्याला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असतो. ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का ? हे पाहावे लागेल.

ALSO READ THIS  : ‘डिलिव्हरी बॉय’  9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीलाhttps://filmykhabare.com/delivery-boy-marathi-movie-delivery-boy-will-release-on-february-9/