Shivani Surve Marriage : शिवानी सुर्वे अडकली लग्नाच्या बेडीत

Shivani Surve Marriage :  मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे अखेर लग्न बेडीत अडकली. शिवानीने अजिंक्य ननावरे याच्याशी लग्नगाठ बांधली. चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील तीच्या मित्रमंडळीनी तिला प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.  शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे या जोडप्याने ३१ जानेवारीला साखरपुडा तर १ फेब्रुवारीला लग्नाचा बार उडवून दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. शिवानी-अजिंक्यचा विवाहसोहळा १ फेब्रुवारीला ठाण्यात थाटामाटात पार पडला. ‘झिम्मा’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट अभिनेत्रीच्या लग्नाला उपस्थित होती. त्याचबरोबर माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे यांनीही लग्नाला हजेरी लावली. अजिंक्यने घोड्यावर बसून लग्नमंडपात एन्ट्री घेतली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Shivani surve – Ajinkya Nanavare got Married

अभिनेत्री शिवानी सुर्वे छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘झिम्मा २’ चित्रपटात तिने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. शिवानी गेली अनेक वर्षे अजिंक्य ननावरेला डेट करत होती. या दोघांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झाले. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र होते. अखेर आज ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकली आहे.

ALSO READ THIS : https://filmykhabare.com/have-you-seen-the-teaser-of-siddharth-jadhavs-lagnakallol/