Saurabh Choughule and Yogita Chavan Wedding : मल्हार बनला अंतराचा आयुष्यभराचा ‘हमसफर’

Saurabh Choughule and Yogita Chavan Wedding : मराठी टीवी कलाकारांमध्ये लग्नाची अक्षरशः लाट आली आहे. प्रथमेश परब, रुपाली भोसले, पियुष रानडे – सुरुची आडारकर, अमृता देशमुख- प्रसाद जवादे पाठोपाठ आता योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.  इतकेच नव्हे तर योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या लग्नाचा टीवी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनाही सुखद धक्का बसला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
yogita chavan-saurabh choughule marriage

कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेल्या ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘जीव माझा गुंतला’मध्ये योगिताने अंतरा, तर सौरभने मल्हारचे पात्र साकारले होते. घराघरांत अंतरा-मल्हारची जोडी अन् नायिकेची हमसफर रिक्षा लोकप्रिय झाली होती. मालिकेदरम्यान दोघांच्या इंस्टाग्राम रील मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायच्या. रीलमध्ये दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळायची. छोट्या पडद्यावरील अंतरा-मल्हारची ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा ३ मार्चला पार पडला. योगिताने फोटो शेअर करत  चाहत्यांना सुखद धक्का दिला.

ALSO READ THIS : https://filmykhabare.com/firoza-khan-aka-khanzaadi-right-now-i-am-single/

योगिताने या फोटोला “३ मार्च २०२४… आयुष्यभराचा हमसफर” असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये सौरभ योगिताला मंगळसूत्र घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यात योगिताने लाल रंगाची साडी, हिरवा चुडा, गळ्यात दागिने असा पारंपरिक लूक केला होता. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करत त्यावर वेलवेटची हिरवी शाल घेतली होती.  समृद्धी केळकर, कश्मिरा कुलकर्णी, पूर्वा फडके, संग्राम समेळ यांसह अनेक कलाकारांनी या योगिता आणि सौरभवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.