Delivery Boy Marathi Movie : ‘डिलिव्हरी बॉय’ येणार 9 फेब्रुवारीला

Delivery Boy Marathi Movie  सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले बस्तान बसविलेला दगडू अर्थात प्रथमेश परब ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy) चित्रपटाच्या माध्यमातून 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप यांच्या या सिनेमाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हे दोघेही गावातल्या काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला सिनेमात दिसणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
   Delivery Boy Upcoming Marathi Movie

गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाऊन वेगवेगळे विषय हाताळले आले. अशाच ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy) सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर ने सिनेमाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘सरोगसी या काहीशा गंभीर विषयाची विनोदी अंगाने मांडणी करण्यात आली आहे. मोहसीन खान यांनी ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy)  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात  अंकिता लांडे-पाटील हिचीदेखील प्रमुख भूमिका आहे.

ALSO READ THIShttps://filmykhabare.com/riteshs-wade-wins-itke-awards-at-zee-awards/

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy)  या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.दिग्दर्शक मोहसीन खान  यांच्या मते,  या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे.

ALSO READ THIShttps://filmykhabare.com/i-have-completed-the-script-of-ssmb29-vijayendra-prasad/