महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ १ मार्च रोजी होणार प्रदर्शित

‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gath)  : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले (Gouri Ingvale) यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांची आहे. संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Hi Anokhi Gaath Marathi Movie

काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता.  श्रेयसच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. मराठीसह बॉलीवूड मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोहित शेट्टी याच्या ‘गोलमाल’ चित्रपटाच्या सिरीजने त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनसाठी श्रेयसने केलेल्या हिंदी डबिंगचे सर्वत्र कौतुक झाले होते. श्रेयस आजारपणानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ALSO READ THIShttps://filmykhabare.com/have-you-seen-the-teaser-of-siddharth-jadhavs-lagnakallol/

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ‘झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच.झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट घेऊन येते. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक समीकरण झालं आहे.