लग्नकल्लोळ आगामी चित्रपट : ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील रणवीर सिंग अर्थात सिद्धार्थ जाधवचा ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सिद्धार्थने मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सिद्धार्थच्या ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती. सिद्धार्थ जाधवने आपल्या इन्स्टाग्रामवरुन ‘लग्नकल्लोळ’चा टीझर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले “डोईवर पडणार अक्षता, मांडव सजला दारी. वरमाला घेऊन उभी हातात नवरी, टिझर पाहायला मात्र जमली मंडळी सारी!! !! लग्न कल्लोळ आहेराची तारीख १ मार्च २०२४” सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
या चित्रपटात सिद्धार्थबरोबर भूषण प्रधान, मयुरी जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहे. टिझरमध्ये सिद्धार्थबरोबर मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. मात्र, मयुरी नक्की कोणाबरोबर लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. येत्या १ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ALSO READ THIS : https://filmykhabare.com/delivery-boy-marathi-movie-delivery-boy-will-release-on-february-9/
या चित्रपटाची निर्मिती आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी केली आहे. ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाची कथा जितेंद्रकुमार परमार यांनी लिहिली आहे. तर मोहम्मद एस. बर्मावाला व डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.