Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

Navra Maza Navsacha 2 : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण ५ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना खूपच आवडला होता आणि छते गेली कित्येक वर्षे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पहात आहेत. प्रेक्षकांची इच्छापूर्ती लवकरच होणार आहे, कारण  ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Navra Maza Navsacha 2 : ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या क्लॅपचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिल आहे, “नवरा माझा नवसाचा २….चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून सुरू होतं आहे. तुमचे आशीर्वाद पाठिशी राहू द्या.” दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे अनेक तगडे कलाकार होते.