PLANET MARATHI ओटीटी प्लॅटफॉर्म विस्तारतोय

PLANET MARATHI : ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी वाहिनीने विस्तार सुरु केला आहे. ‘प्लॅनेट मराठी’ने अल्पावधीत दर्जेदार वेबसिरीज आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Voot, Zee5, SonyLiv, AltBalaji अशा विविध ओटीटी वाहिन्यांच्या स्पर्धेत ‘प्लॅनेट मराठी’ने मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आता आपला विस्तार करत आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या आशयनिर्मिती संबंधित समितीवर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अभिजीत पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
RAAN BAZAAR 2 ANNOUNCEMENT

‘प्लॅनेट मराठी’ ने बुधवारी पानसे यांनी लिहिलेल्या ‘रानबाजार’ या गाजलेल्या वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या ‘पुरुष’ या नाटकावर वेब सिरीजची निर्मिती करणार असल्याचेही पानसे यांनी सांगितले. लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि रघुवीर तळाशिलकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘पुरुष’ हे नाटक १९८२ साली पहिल्यांदा रंगमंचावर आले होते.

ALSO READ THIS : https://filmykhabare.com/moana-2-is-coming-to-theaters-this-november-2024/

नाना पाटेकर, रीमा लागू, उषा नाडकर्णी यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांच्या अभिनयाने हे नाटक गाजले. अभिजीत पानसे यांच्या रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने या वेब मालिकेची निर्मिती करण्यात येत असून अभिनेते सचिन खेडेकर यात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.