ZEE AWARD’S : हरहुन्नरी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘वेड’ चित्रपटाचे दमदार कथानक, रितेश आणि जेनेलियाचा दमदार अभिनय आणि जोडीला अजय-अतुलचे श्रवणीय संगीत यामुळे ‘वेड’ चित्रपटाने उत्पन्नाचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. आता ‘वेड’ चित्रपटाने ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कौन’ पुरस्कार सोहळ्यात बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे. झी टाकीजतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच (मुंबई फिल्म कंपनी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (रितेश देशमुख), सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला- जेनेलिया देशमुख), सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष – रितेश देशमुख), सर्वोत्कृष्ट गाणे (सुख कळले- अजय आणि अतुल)सर्वोत्कृष्ट गायक पुरुष (वेड तुझे – अजय आणि अतुल), सर्वोत्कृष्ट गायिका (महिला- श्रेया घोशाल – सुख कळले), वर्षातील लोकप्रिय चेहरा (जेनेलिया देशमुख) वर्षातील स्टाईल आयकॉन (रितेश देशमुख) अशा विविध पुरस्कारावर रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटाने मोहोर उठवली.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
याबाबत रितेश देशमुख याने x वर…या सन्मानाबद्दल आम्ही आपल्या सर्वांसाठी अपार कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, ज्यांनी आम्हाला मतदान केले त्या प्रत्येकाचे खूप आभार. @zeetalkies आणि @भावेश धन्यवाद. हे आयुष्यभर लक्षात राहील, असे म्हटले आहे. हे पुरस्कार मिळाल्याबद्दल रितेश आणि जेनेलिया यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेत्कार्यानी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
ALSO READ THIS : https://filmykhabare.com/i-have-completed-the-script-of-ssmb29-vijayendra-prasad/
Comments are closed.